अमळनेर येथील परिविक्षाधीन डीवायएसपी केदार बारबोले तालुक्यातील गुन्हेगारी च्या पार्श्वभूमीवर एक्शन मोड वर असल्याची चर्चा सुरू.

सविस्तर वृत्त की, तालुक्यात अवैध धंदे चा सुळसुळाट झाला आहे. शहरातील अनेक मोटरसायकल चोरी सह घरफोड्या,बॅग लिफ्टिंग सारख्या वाढल्या आहे.शहरातील अनेक ठिकाणचा तिसरा डोळा अर्थात कॅमेरे बंद अवस्थेत आहे.तसेच अनेक दिवसांपासून उपविभागीय पोलीस अधीकारी नसणे व सध्या तीन महिन्या करीत पोलीस ठाण्यात परिविक्षाधीन डीवायएसपी असल्याने गुन्हेगारी ने डोके वर काढल्याचे चित्र निर्माण झाल्याचे दिसते.
मात्र परिविक्षाधीन डीवायएसपी केदार बारबोले यांनी येताच अवैध जुगार अड्डे सह सट्टा सारखे अवैध धंदे बंद करण्याचा चंग बांधला.तसेच तालुक्यात अवैध वाळू तस्करीला आळा बसविण्यासाठी पाऊल टाकले. याच पार्श्वभूमीवर परिविक्षाधीन डीवायएसपी केदार बारबोले यांना तालुक्यातील टाकरखेडा येथे सुरू असलेल्या मोठ्या जुगार अड्डया बाबत माहिती मिळताच छापा टाकून १ लाख २६ हजार ९६० रुपये रोख आणि ५ मोटारसायकली,एक रिक्षासह ३ लाख४६ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करन ९ आरोपींविरुद्ध जुगार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर , एएसआय राजेंद्र कोठावदे , हेड कॉमिलिंद सोनार , विनोद संदानशीव ,निलेश मोरे ,उज्वलकुमार म्हस्के , गणेश पाटील ,अमोल पाटील , सचिन पाटील,राहुल पाटील,उदय बोरसे आदींनी केली.

पोलिसांनी तेथून प्रकाश भगवान महाजन माळीवाडा धरणगाव , भाईदास सोनू अहिरे रा लोणे अमळनेर, रमेश आत्माराम महाजन रा हनुमान नगर धरणगाव , बापू जगन्नाथ पाटील शिवाजीनगर पैलाड, समाधान धर्मा पाटील टाकरखेडा , शिवलाल धर्मा पाटील टाकरखेडा , विजय पंढरीनाथ सोनवणे रा निशाणे ता धरणगाव , शिवदास प्रकाश धनगर रा नेहरूनगर धरणगाव , धंनजय श्रीराम चव्हाण बोरसे गल्ली अमळनेर याना झन्ना मन्ना जुगार खेळताना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १ लाख २६ हजार ९६० रुपये रोख व २ लाख२० हजार रुपये किमतीच्या ५ मोटरसायकली आणि १ रिक्षा असा एकूण ३ लाख ४६ हजार ९६० मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशनला आणण्यात आला.
पुढील तपास हे.कॉ. संदेश पाटील करीत आहेत.
