जळगांव स्थागुशा च्या पथकाने अंतुर्लीत सट्टे खोराला घेतले ताब्यात

जळगांव स्थागुशा च्या पथकाने अंतुर्लीत सट्टे खोराला घेतले ताब्यात

अमळनेर येथील मारवड पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या अंतुर्ली गावात दि २० रोजी जळगाव स्थानिक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सट्टा घेणाऱ्या विष्णू सीताराम भील यास जागीच पकडले असता बाजूला सट्टा घेणारा हा बाजीराव भील (रा. पडासदले) हा पळून गेला.मात्र पथकाने त्याठिकाणी जुगाराचे साहित्य व १८३० रू.रोख असा मुद्देमाल आढळून आला. त्यावरून मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ सचिन निकम हे करीत आहेत.
मारवड पोलीस ठाण्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने त्याला पायबंद घालावा,अशी मागणी ग्रामस्थ करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!