शंकेश्वर नगर मधील रहिवासी तब्बल दोन महिन्यांपासून वंचीत—मुख्याधिकारीनां घालणार घेराव

अमळनेर येथील शंकेश्वर नगर येथे पिण्याच्या पाण्याची भिषन टंचाईला नागरिक गेल्या दोन महिन्यापासून सामोरे जात आहेत. न पा प्रशासनाला वारंवार अर्ज देऊन सुद्धा पालिका प्रशासन सुस्त दिसून येत आहे.नागरिक मात्र पुरते पाण्या अभावी त्रासलेले आहेत. नवीन पाईप लाईन टाकून देखील पाणी येत नसल्याने हजारो रुपये पाण्याससाठी दर तीन दिवसात मोजावे लागत आहेत. अधिकारी व लोक प्रतिनिधी मात्र “भाड मे गई जनता, आपणा काम बनता”, असे वागतांना दिसत आहेत.

एकवीसाव्या शतकात पिण्याचे पाणी दोन महिन्या पासुन मिळत नाही हे दुर्दैव व अतिशय लाजिरवाणी व लांछानस्पद व निंदनीय अशी बाब आहे.पालिका प्रशासन सदर नागरिकांच्या अर्ज विनंती फाट्यावर मारत असल्याचे नागरिकांचे लक्षात आलेले आहे.तीन दिवसात पाण्याची पर्यायी व्यवस्था न केल्यास मुख्याधिकारी यांना घेराव घालण्यात येईल व त्याप्रसंगी काही अनुचित प्रकार घडल्यास पालिका प्रशासान जबाबदार राहील असे शंकेश्वर नगर मधील रहिवासी सोमा कढरे यांनी कळवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!