नेता कसा ओळखावा ?

 

प्रत्येक मतदारसंघात आमदारांना एक तगडा प्रतिस्पर्धी पाहिजे.जो कायम कार्यरत राहिल.फक्त निवडणूक पुरता मैदानात येणारा काहीच कामाचा नसतो.आपल्या जळगाव जिल्ह्यातील असा कोण कोण विधानसभा उमेदवार आहेत,जो निवडणूक हारल्यानंतर ही प्रशासकीय कामे करतो?१० दिवसांचा नवरदेव आणि ५ वर्षे रिकामटेकडा असतो,तो उमेदवार खरा नेता नसतोच.

    गिरीश महाजन यांना तगडा विरोधक पाहिजे जो पुर्ण पांच वर्षे कार्यरत पाहिजे.गुलाबराव पाटलांना तगडा विरोधक पाहिजे जो पुर्ण पांच वर्षे कार्यरत पाहिजे.असाच भोळे,पाटील, चव्हाण ,सावकारे यांना प्रतिस्पर्धी पाहिजे.

   पक्षाचे तिकीट मिळाले तर निवडणूक लढतो .नाही मिळाले तर घरी बसतो.असा नको.पक्षाने तिकीट दिले, नाही दिले तरीही कायम लढतो तोच नेता असतो.बाकी कावळ्याच्या छत्री सारखे उगवतात.पक्षापासून निधी मिळाला कि त्याच्यातून खर्च न करता आपली दुकाने थाटतात.पुन्हा आपल्या कमाईला लागतात.म्हणे आता पन्नास कोटी कमावणार मग निवडणूक लढणार.असा माणूस जनतेचे हित कमी, स्वताचे हित जास्त पाहातो.संधी साधू असतो.

    जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी, शिवसेना, कांग्रेस चे उमेदवार हारले आणि घरी जाऊन झोपले.ही माणसे जनतेचे नेते नाहीतच.संधी साधू आहेत.

    माजी आमदार खासदार राजू शेट्टी निवडणूक हारल्यानंतर एक दिवस घरी बसले नाहीत.माजी आमदार माजी मंत्री बच्चू कडू एकमेव माणूस आहे कि निवडणूक हारल्यावर ताबडतोब महाराष्ट्रात दौरा करीत आहेत.नाशीकचे जितेंद्र भावे निवडणूक हारल्यानंतर घरी जाऊन गोधळीत तोंड लपवून झोपले नाहीत.हे खरे नेते.ज्यांना जनतेच्या अडचणींची जाणिव असते.आणखी कोणी असेल तर सांगा.

   तिकडे राहुल गांधी आणि कन्हैया कुमार निरंतर लढत आहेत.त्यांना निवडणूक महत्वाची नाही.काम महत्वाचे वाटते.

    शरद पवार,उद्धव ठाकरे,नाना पटोले निवडणूक झाल्यानंतर एक दिवस जळगाव ला आले नाहीत.आधी तर घिरट्या घालत होते.हे चुकीचे आहे.निवडणुक पुरते मतदार पाहिजे.निवडणुक संपली कि तू कोण आणि मी कोण?

      असे नेते ओळखले पाहिजे.शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी येथेच चूक करतो.लोकांनी मत दिले, नाही दिले तरीही ज्यांच्यातील माणूस मरत नाही.ज्यांच्यातील नेता मरत नाही.तोच खरा नेता.तोच आमदार खासदार बनण्याच्या लायकीचा असतो.ही गुणवत्ता ओळखली पाहिजे.तरच आमदार आणि मतदार यातील अंतर कमी होईल.

    मतदारांना आशा असते.आपण यांच्या साठी पैसा दिला,वेळ दिला, प्रचार केला तर हा निवडून येईल.नाही निवडून आला तरी सरकारी कामात मदत करील.पण हे उमेदवार जर अज्ञातवासात निघून जात असतील तर ते नेते नाहीतच.धंदेवाईक आहेत.कमाईसाठी,मलिदासाठी ते निवडणूक लढतात.ते बोगस उमेदवार असतात.मतलबी उमेदवार असतात.संधी साधू उमेदवार असतात.

    निवडणूक लढणे म्हणजे विधानसभेत किंवा लोकसभेत जाण्याचा मार्ग आहे.सत्तेत जाण्याचा मार्ग आहे.पण नाही जिंकले तर काम बंद करणे साफ चुकीचे आहे.गांधीजी, जयप्रकाश नारायण, आण्णा हजारे ना आमदार होते ,ना खासदार होते.तरीही सर्वात जास्त काम केले आहे.जे आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री प्रधानमंत्री सुद्धा करू शकले नाहीत.

    नेता निरंतर काम करतो.नेतृत्व निरंतर कार्यरत असले पाहिजे.नागरिकांच्या अडचणींची,समस्यांची जाणीव मनातून असली पाहिजे.तोच खरा नेता.

   आम्ही अनेक पक्षांच्या नेत्यांना, प्रदेश अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष यांना भेटतो.का? तुम्ही जळगावला या.आमच्या कामात मदत करा.पद आहे तर काम करा.तो खरोखरच नेता असेल, जाणिव असेल तर येईल.फक्त पदापुरता असेल तर नाही येणार.यावरून आम्ही नेत्यांची पारख करतो.कोण चांगला,कोण वाईट?

    … शिवराम पाटील,

महाराष्ट्र जागृत जनमंच, जळगाव

मो ९२७०९६३१२२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!