बहुजन समाजाने महामानवांच्या विचारांची कास धरा….इतिहास अभ्यासक गंगाधर बनबरे 

 

अमळनेर : महामानवांनी अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रद्धा यांना विरोध केला आणि मानवतावादी व विज्ञाननिष्ठ समाज निर्माण केला .ग्रामीण भागात लग्न व उत्तर कार्यावर कर्ज काढून भरमसाठ खर्च केला जातो हे समाजातील वास्तव आहे. मुलांना मोठी स्वप्न दाखवा. आई-वडिलांना देव माना व त्यांची जिवंतपणे सेवा करा. संविधानाच्या माध्यमातून हक्क कर्तव्यांचा अभ्यास करा व ती आपल्या जीवनात उतरवा. महामानवांच्या विचारांची कास धरा असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे मुख्य प्रवक्ते व सुप्रसिद्ध लेखक ,विचारवंत गंगाधर बनबरे यांनी अमळनेर तालुक्यातील लोंढवे येथील जाहीर व्याख्यानातून व्यक्त केले. अध्यक्ष स्थानी माजी आमदार डॉ. बी एस पाटील होते.

लोकनियुक्त सरपंच सौ भारती पाटील यांचे पती अशोक पाटील सामाजिक कार्यकर्ते व सुप्रसिद्ध व्यावसायिक यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत लोंढवे व ग्रामस्थांच्या वतीने प्रबोधन पर व्याख्याना चा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी केंद्रप्रमुख आणि महाराष्ट्र मौर्यक्रांती संघाचे उपाध्यक्ष बन्सीलाल भागवत यांनी केले. तर सूत्रसंचालन शिवव्याख्याते डी ए पाटील यांनी केले. विचार मंचावर प्रा अशोक पवार,सुवर्णा बनबरे, तेजस धनंजय पाटील, मनोहर नाना, अशोक बिऱ्हाडे, अरुण देशमुख, बाळासाहेब पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

अशोक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत लोंढेवे व प्रतिष्ठित ग्रामस्थ, मराठा सेवा संघ, युवा कल्याण प्रतिष्ठान , मौर्य क्रांती संघ व अंमळनेर शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी यांनी सत्कार केला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पंचायत समितीचे माजी उपसभापती व मुख्याध्यापक बाळासाहेब जीवन पाटील यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपसरपंच चतुर पाटील, ज्ञानेश्वर पवार, मिनाबाई जिजाबराव पाटील डॉ. कुणाल पवार, दिलीप गोरख पाटील, नारायण अभिमन पवार ,कैलास दामू खैरनार ,प्रभाकर आबा ,संतोष अण्णा, अर्जुन भागवत, गोटू पाटील, दत्तात्रेय पाटील, दीपक पाटील, श्रीराम पाटील आदी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!