अमळनेर येथील श्रद्धा नगर मध्ये पाहुणे म्हणून आलेल्याची चारचाकी चोरीला गेल्याची घटना घडल्याने परिसरात उडाली खळबल
सविस्तर वृत्त की, शहरातील श्रद्धा नगर मधील रहिवासी प्रवीण ठाकूर यांच्या कडे त्यांचे मेहुणे परिवारासह आपल्या एमएच 18, एजे 3I0 क्रमांकाच्या चारचाकीने आले होते.मात्र नंतर मेव्हणे मनीष पवार हें कामानिमित्त
दिल्ली गेल्याने चार चाकी प्रवीण ठाकूर यांच्या घरा समोर लावली होती. पहाटे पाच वाजेच्या सुमारस प्रवीण ठाकूर लघु शंकेला उठले असता त्यांना चार चाकी दिसून आली नाही. याबाबत त्यांनी याबाबत अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असता अज्ञात चोरट्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहेत.
पोलीस निरीक्षक द्त्तात्रय निकम यांनी पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ,हेकॉ मिलिंद सोनार ,विनोद संदानशीव, उज्वल म्हस्के, प्रशांत पाटील,जितेंद्र निकुंभे, निलेष मोरे ,रवी पाटील,अमोल पाटील तसेच एलसीबी पथक प्रवीण मांडोळे,संदीप पाटील,राहूल कोळी यांची पथके चोरांचा शोध घेण्यासाठी रवाना केले आहेत.
