अमळनेर येथील चौबारी गावातील येथील विवाहितेने राहत्या घरी गळफास घेतल्याची घटना घडल्याने उडाली खळबळ.

सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील चौबारी गावातील सासुरवाशीन विवाहिता जागृती निलेश पाटील (वय २५) हिने आपल्या राहत्या घरी लोखंडी कडीला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे दि 19 रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास उघडकीला आले. मयत जागृती हिचे २०२१ मध्ये
चौबारी येथील निलेश कैलास पाटील याच्याशी लग्न झाले होते व त्यांना दीड वर्षाची मुलगी सुध्दा आहे.मात्र आत्महत्येचे कारण अद्याप समजले नसून मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेकॉ मुकेश साळूखे करीत आहेत.
