रात्री ट्रक अडवून ड्राव्हरल लुटणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या..

अमळनेर शहर प्रतिनिधी, येथील गलवाडे रस्त्यावर ट्रक अडवून चालकाच्या गळ्याला चाकू लावून एक हजार रुपये हिसकावून मालकाकडून एक लाख रुपयांची मागणी करत खून करण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना २७ एप्रिल रोजी पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडली.

सविस्तर वृत्त असे की,अनिल अश्रूबा विलग (रा. कोनोसी ता. शिवगाव, जि. अहिल्यानगर) हा ट्रक ड्रायव्हर हा स्वप्नील झिने यांचा मालकीचा हायवा ट्रक (क्रमांक MH-16-CE-4797) भुसावळ येथून फ्लॅश पावडर घेऊन नरडाणा येथे जात असताना अमळनेर मधील गलवाडे रस्त्यावर मोटरसायकलवर आलेल्या तीन जणांनी ट्रक आडवला. त्यापैकी एकाने स्वतःची ओळख “कैलास नवघरे असून मी अमळनेरचा डॉन” म्हणून करून दिली. त्याने ट्रकच्या केबिनमध्ये चढून चालकाच्या गळ्याला चाकू लावला आणि एक लाख रुपये मागितले. दरम्यान चालकाच्या खिशातून जबरदस्तीने एक हजार रुपये काढून घेतले . दुसऱ्या व्यक्तीने आपले नाव मोझम शेख असल्याचे सांगितले. या टोळीने ट्रक मालकाला फोन करून एक लाख रुपये न दिल्यास खून करण्याची धमकी दिली.चालकाला मालकाला फान करून पैसे मागवण्यास संगितले व ट्रक बाजूच्या कॉलनीत घेऊन जाण्याचा प्रयत्नही केला.

दरम्यान, चालकाच्या सूचनेवरून मालकाने तात्काळ अमळनेर पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वाखाली राजेंद्र कोठवदे, संतोष पवार, मिलिंद सोनार, विनोद संदानशिव, सुनील पाटील, योगेश बागुल आणि संजय सोनवणे घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना पाहताच मोझम शेख व तिसरा अनोळखी आरोपी पळून गेला. मात्र, कैलास नवघरे याला तात्काळ अटक करण्यात आली. तो यापूर्वी खून प्रकरणात शिक्षा भोगत असून तो सध्या पॅरोलवर बाहेर आला होता. दि २७ एप्रिल रोजी त्याला पुन्हा तुरुंगात परत जायचे होते, मात्र त्याआधीच या गुन्ह्यात तो पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

प्रकरणी तिघांविरुद्ध जबरी चोरी आणि रस्ता अडवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!