अमळनेर येथील लोकप्रतिनिधी सह प्रशासना तर्फे शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना दिली मानवंदना.

सविस्तर वृत्त असे की,रयतेचे राजे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी राजे भोसले यांच्या ३९५ व्या जयंती निमित्त तालुक्यातील विविध ठिकाणी ढोलताशांच्या गजरात मानवंदना देण्यात आली.शहरातही लोकप्रतिनिधी आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते शहरातील शिवाजी महाराज उद्यानात महाराजांच्या अर्धपुतळव्याचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले.त्यापुर्वी राज्य गीत सादर करण्यात आले.
याप्रसंगी तहसीलदार रुपेश कुमार सुराणा, परिविक्षारधीन पोलीस निरीक्षक बारबोले, पोलीस निरीक्षक विकास देवरे,नप चे मुख्याधिकारी तुषार नेरकर,जळगाव जनता बँकेचे मॅनेजर महेश गर्गे,माजी नगरसेवक नरेंद्र संदानशिव,घनश्याम पाटील,राजेंद्र यादव,निवृत्त प्रशासन अधिकारी संजय चौधरी, अमळनेर पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत, कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रसाद शर्मा,अरुण पाटील,नर्मदा वाडीचे अध्यक्ष नितीन कुमार शाह,सौ उज्वला शिरोडे,सौ संगीता जैन, बांधकाम अभियंता डिगंबर वाघ,आरोग्य निरीक्षक संतोष बिऱ्हाडे,महेश जोशी,प्रभाकर पाटील, साखरलाल महाजन,गोविंदा बाविस्कर यासह गार्डन ग्रूपचे सदस्य व नप कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच नाट्यगृहातील छत्रपती शिवरायांच्या भव्य पुतळ्याचे ही सामूहिक पूजन आमदार अनिल पाटील यांच्यासह अधिकार्यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्यांनी मानवंदना दिली.
