नविन वाहनांकरीता आकर्षक किवा पसंतीचा नोंदणी क्रमांक हवा असल्यास दि २४ फेब्रुवारी पर्यंत अर्ज दाखल करा – सहाय्यक प्रादेशिक वहन अधीकारी सचिन बुरूह

जळगाव येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालय परिवहन सवर्गातील दुचाकी वाहनांची नवीन नोदणी एमएच-१९/ईक्यू ०০०१ ते ९९९९ पर्यतची मालिका लवकरच सुरू करण्यात येणार आहे.ज्या वाहन धारकाना आपल्या नविन वाहनांकरीता आकर्षक किवा पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करावयाचा असल्यास त्यानी या कार्यालयात २४ व २५ फेब्रुवारी रोजी अर्ज दुपारी ४ वाजेपर्यंत जमा करायचे आहे. तसेच पसंती क्रमांकाच्या अर्जासोबत अर्जदाराने क्रमाकानुसार विहित केलेल्या शासकीय शुल्काचा राष्ट्रीयकृत बॅकेचा डीड़ी उप प्रादेशिक परिवहन आथिकारी,जळगाव याच्या नावे तसेच वाहन ज्यांच्या नावाने नोंदणी करावयाचे आहे, त्यांचा पत्ता पुरावा व आधारकार्डशी सलग्न मोबाईल क्रमांक सादर करणे बधनकारक असणार आहे. २५ रोजी अर्जाची छाननी करण्यात येणारआहे.कार्यालयात एका क्रमांकसाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास एका पेक्षा जास्त अर्ज आलेल्या क्रमाकाच्या बाबतीत २७ रोजी दुपारी ३ वाजेपर्यत वाढ़ीव शुल्काचा धनाकर्ष स्वतंत्र बंद लिफाफ्यातून सादर करणे बंथनकारक राहणार आहे. बंद लिफाफे हे २७ रोजी परिवहन अधीकारी याच्या समक्ष उघडण्यात येतील.जास्त रकमेचे धनादेश सादर
केलेल्या अर्जदारास क्रमाक देण्यात येईलअसे सहाय्यक प्रादेशिक वहन अधीकारी सचिन बुरूह यांनी पत्रकान्वये कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!