श्रीमती डी. आर. कन्या शाळेत ‘स्वयंशासन दिना’तून शिक्षक दिनाचा अनोखा अनुभव

अमळनेर : खान्देश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती डी. आर. कन्या शाळेत भारताचे पहिले उपराष्ट्रपती व प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळ व दुपार अशा दोन्ही विभागांत विद्यार्थिनींनी शिक्षकांच्या भूमिका साकारत ‘स्वयंशासन दिना’चा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवर तसेच विद्यार्थी प्रतिनिधींच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी व उपमुख्याध्यापक श्री. एस. आर. शिंगाणे होते. मंचावर पर्यवेक्षक श्री. एस. पी. वाघ, शिक्षक प्रतिनिधी सौ. पी. पी. जोशी, ज्येष्ठ शिक्षक श्री. एस. एस. माळी, ज्येष्ठ क्रीडा शिक्षिका श्रीमती आर. एस. सोनवणे तसेच विद्यार्थी संघाच्या प्रतिनिधी उपस्थित होत्या.

यावेळी विद्यार्थी प्रतिनिधींनी दिवसभर शिक्षकांच्या विविध भूमिका पार पाडत विद्यार्थ्यांना अध्यापन केले. मुख्याध्यापिका म्हणून भूमिका यशस्वी शिंगारे, जान्हवी साळुंखे, रोशनी पाटील, अश्मीरा शेख, अर्पिता अहिरराव, प्रांजल पवार, खुशी पाटील, माहेश्वरी न्याहाळे व प्रांजल पाटील आदी विद्यार्थिनींनी जबाबदारी सांभाळली. विद्यार्थिनींनी प्रत्यक्ष अध्यापन करताना शिक्षक म्हणून येणाऱ्या जबाबदाऱ्या व आव्हानांचा अनुभव घेतला.

सकाळ विभागाचे सूत्रसंचालन आरोही गोसावी, तर दुपार विभागाचे सूत्रसंचालन निकिता पाटील यांनी केले. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा तसेच शिक्षक म्हणून त्यांनी केलेल्या योगदानाचा प्रेरणादायी शब्दांत आढावा घेतला.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सहभागी विद्यार्थिनींनी स्वयंशासन दिनातील अध्यापनाचा अनुभव आपल्या मनोगतातून व्यक्त केला. उत्कृष्ट सहभाग नोंदविणाऱ्या विद्यार्थिनींना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!