ए. बी. ग्रुप च्या वतीने भीमा कोरेगावच्या प्रतिकृती विजयी स्तंभाला दिली सलामी… दरवर्षी स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा केला संकल्प

अमळनेर येथे दिनांक 1 जानेवारी 2025,बुधवार रोजी शहरातील फारशी रोड,राजवाडा येथे अमळनेर शहरात प्रथमच A. B. ग्रुप चा माध्यमातून बहुजनांची आन-बान-शान आणि गौरव असलेल्या आपल्या 500 महावीर पुर्वजांच्या शौर्या चे प्रतीक असलेल्या भीमा कोरेगाव विजय स्तंभाच्या प्रतिकृतीला मानवंदना देऊन विजयी दिन आनंदाने साजरा केला.यापुढे दरवर्षी हा विजयी दिन सर्व समाज बांधवांना एकत्रित करून मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा संकल्प या वेळेस आयोजकांनी केला.

या कार्यक्रमात अमळनेर पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी ही या विजयी स्तंभाला मानवंदना दिली व आपल्या मनोगतात सांगितले की, हा इतिहास जास्तीत जास्त लोकांना माहीत व्हावा म्हणून या ऐतिहासिक घटनेच्या प्रकाशित पुस्तकांचे वाटप जन माणसात करणे आवश्यक आहे.शहरात या नवी परंपरेची सुरवात केली म्हणून A. B. ग्रुप चा सदस्यांचे मनपूर्वक अभिनंद ही त्यांनी या वेळी केले.

सदर कार्यक्रम चे आयोजन AB ग्रुप राजवाडा फरशी रोडचे राज रामराजे,विशाल सोनावणे,गौरव सोनावणे,अजय बिऱ्हाडे,नयन मोरे,दर्शन बिऱ्हाडे,सोनू सोनावणे,रुद्रा संदांशिव,राहुल बिऱ्हाडे,हेमंत वाघ,दिनेश शिंपी आदींनी केले होते.

याप्रसंगी समाज बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!