अमळनेर (प्रतिनिधी) : गांधलीपुरा भागातील भरुचा वाईन शॉपजवळ एका तरुणावर कोयत्याने वार करून प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना ५ सप्टेंबर रोजी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी सराईत गुन्हेगार राजेश उर्फ दादू धोबी याला अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे.

