अमळनेर : ३१ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच बोरी नदीला आलेल्या महापुरामुळे अमळनेर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, प्रशासनाकडून सरसकट पंचनामे न करता काही ठिकाणी तोंडदेखले अथवा अर्धवट पंचनामे करण्यात आल्याचा आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केला आहे. त्यानंतर ऑगस्ट महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने पिके उन्हाच्या तडाख्यात सुकू लागली असून शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे.

