अमळनेर पोलिसांचा प्रशांत कोरटकर विरोधात गुन्हा नोंदविण्यास ना…बहुजन समाजाचा रात्री पोलीस स्टेशनला ठिय्या आंदोलन

अमळनेर येथील बहुजन समाजाच्या वतीने छत्रपती शिवराय व संभाजी राजे यांच्या विषयी गरळ ओकणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात गुन्हा दाखल व्हावा या मागणीला पोलिसांनी ना केल्याने बहुजन समाजाच्या वतीने पोलीस ठाण्यातच केले ठिय्या आंदोलन.


सविस्तर वृत्त की, अमळनेर बहुजन समाजातर्फे शिवरायां सह बहुजन नायकाचा सातत्याने होत असलेल्या अपमान विरोधात आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी शहरातील मराठा मंगलकार्यालयात बैठक घेऊन प्रशांत कोरटकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यास गेले असता डीवायएसपी विनायक कोते व परिविक्षाधीन डीवायएसपी केदार बारबोले यांनी गुन्हा दाखल करण्यास नकार देत पोलीस अधीक्षकांनी जिल्हास्तरावर गुन्हा दाखल व्हावे म्हणून बोलावले आहे असे सांगितले. त्यावर कार्यकर्त्यांनी जर एसपी गुन्हा दाखल करण्याचे व जळगाव येण्याचे लेखी पत्र देत असतील तर अवश्य जाऊ अन्यथा याच ठिकाणी आंदोलन करू अशी भूमिका घेतली आणि पोलिसांनी निवेदन घेण्यासही नकार दिला म्हणून घोषणा देत मनोहर निकम , श्याम पाटील ,कैलास पाटील , जे. पी.पाटील ,सुभाष पाटील , प्रा अशोक पवार, प्रशांत निकम , मनोज पाटील ,बी के सूर्यवंशी , श्याम पवार , भूषण भदाणे ,एस एम पाटील ,तिलोत्तमा पाटील ,माधुरी पाटील , प्रा शीला पाटील , पद्मजा पाटील ,वसुंधरा लांडगे ,महेंद्र पाटील , देवेंद्र देशमुख ,मुख्तार खाटीक ,रियाज मौलाना ,नावेद शेख ,रहेमतुल्ला पिंजारी ,ऍड यज्ञेश्वर पाटील ,ऍड दिनेश पाटील ,शरद पाटील ,अजय साळुंखे , दीपक काटे ,डॉ कुणाल पवार ,महेश पाटील ,विकास पाटील ,योगेश पाटील अमळनेर बहुजन समाज कार्यकर्ते ठिय्या आंदोलनाला बसले होते. रात्री उशिरापर्यंत दखल न घेतल्याने सर्व कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन आवारातच भोजन घेतले.मात्र नंतर सर्वमते दि 6 मार्च रोजी सर्व बहुजन समाज मिळून भव्य आक्रोश मोर्चा काढण्याचे ठरले व तद्नंतर जमलेले सर्व बहुजन समाज बांधव शांततेत परतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!