अमळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रतील खेडा खरेदीसाठी नेमलेल्या भरारी पथका मार्फत तपासणी केली असता खेड़ा खरेदी पातौड़ा यैथे विना परवाना अवैधरित्या भुसार खरेदी करीत असतांना चोपडा येथील व्यापारी अनिकेत पाटील प्रत्यक्ष आढळुन आल्यामुळे सदर व्यापारी यानी खरेदी केलेल्या मालाचा पचनामा करून महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम, 1963 च्या कायद्यानूसार दड़ात्मक कार्यवाही करुन सदर व्यापा-या कड़न बाजार फी सह एकूण 21000 रुपये दंड वसूल करण्यात आला.

अशोक आधार,सभापती–
यापुढे कोणत्याही व्यापा-याने परस्पर व विना परवाना अवैध खेड़ा खरेदी करताना आढळल्यास दंडात्मक कार्यवाही अथवा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, याची सर्वोनी नौद घ्यावी.

