अमळनेर कृ ऊ बा समिती 141 गुण मिळवून जिल्ह्यात पहिली तर नाशिक विभागात तिसरी

 

अमळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने सण 2023-24 च्या बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत पणन संचालनालयच्या सर्वेक्षणात विविध निकषां नुसार मिळालेल्या गुणांक नुसार जळगांव जिल्ह्यात पहिला तर नाशिक विभागात तिसरा क्रमांक मिळविण्यात यश प्राप्त केले आहे.

सविस्तर वृत्त असे की,महाराष्ट्रातील ३०५ बाजार समित्याचे बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत पणन संचालनालय तर्फे विविध निकषांवर सर्वेक्षण करून गुणांकन करीत असते. सण 2023-2024 च्या सर्वेक्षणात अमळनेर कृ ऊ बा समितीला मिळालेल्या गुणांक नुसार राज्यात राज्यात १७ वे तर जिल्ह्यात प्रथम क्रमांक व नाशिक विभागात तिसरा क्रमांक प्राप्त झाला आहे. मागील सण 2022-23 मध्ये अमळनेर कृ ऊ बा समितीला दुसरा क्रमांक मिळाला होता. त्यानंतर अमळनेर कृ ऊ बा समितीचे सचिव डॉ उन्मेष राठोड,सहसचिव  सुनील सोनावणे व उपसचिव अशोक पुंडलिक वाघ व त्यांचे सहकारी कर्मचारी यांनी सभापती आणि सर्व संचालकांच्या सहकार्याने त्रुटी दूर करून पारदर्शक सुव्यस्थापन करून या वर्षी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकविण्यात यश मिळविले.त्यांचे सर्व स्तरातून कौतुक सह अभिनंदन केले जातं आहे.

 

पणन च्या सर्वेक्षणता मिळालेले गुणांकन :-

     1)पायाभूत सुविधा व सेवा सुविधा अंतर्गत ४४.५ गुण 

    2) आर्थिक कामकाज निकष बाबत ३० गुण 

     3) वैधानिक कामकाजाबाबत ४८ गुण 

     4) इतर निकषाबाबत १९ गुण असे एकूण १४१ गुण मिळाले आहेत.

 

डॉ उन्मेष राठोड, सचिव कृ ऊ बा समिती :-

बाजार समिती सभापती अशोक पाटील,विद्यमान संचालक मंडळ व अधिकारी-कर्मचारी व्यापारी , शेतकरी व पत्रकार बांधव यांच्या सर्वांच्या सहकार्याने बाजार समितीने हें यश प्राप्त केले आहे. 

 

अशोक पाटील ,सभापती , कृ.उ.बा.समिती:-

आजी माजी लोकप्रतिनिधी व सत्ताधारी तथा दोन्ही गटातील संचालकांच्या सहकार्याने बाजार समितीला हे यश.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!