अमळनेर येथील हमाली काम करून मुलांना एमपीएससी या स्पर्धा परीक्षेत मुलांना यश संपादन करण्यात यावे म्हणून अपार कष्ट केल्याने मुलांना मिळाले यश.

सविस्तर वृत्त की, शहरातील ताडेपुरा येथील रहिवासी भगवान देवचंद कंखरे हे हमाली हातमजुरी करून बिकट परिस्थिती तुन आपल्या परिवाराचे उदरनिर्वाह करत आहे. परिस्थिती बेताची होती परंतु आशा परिस्थिती तुन बाहेर पडण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्या प्रमाणे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ,जो कोणी हे दुध प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही, प्रमाणे त्यांनी हा एकमेव मार्ग असल्याचे ओळखले व त्या प्रमाणे मुलांना घडवले.मुलांनीही याची जाणीव ठेवून स्पर्धा परीक्षेत यश मिळावे म्हणून अथक परिश्रम घेतले. याचा परिणाम रोहित कंखरे व शुभांगी कंखरे दोघेही भाऊ बहीण एकाच वेळी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेत.
विशेष बाब म्हणजे शुभांगी कंखरे या परीक्षेत राज्यात 18 व्या क्रमांकावर आहे.म्हणून सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे धनगर समाज बांधवांनी त्यांचा सत्कार केला.
या वेळी भाजपा चे उपाध्यक्ष, चंद्रकांत कंखरे,नवी मुंबई येथील एपीआय सुनील कंखरे,धनराज कंखरे,धनराज नाटू चिंचोरे,आसाराम देवचंद कंखरे,श्रावण दयाराम धनगर आदी उपस्थित होते.
