अमळनेर येथील न्यायालयात आरोपी घेऊन आलेले पोलीस अधिकारी यांना अचानक झटका आल्याने उपस्थित वकिलांनी समयसूचकता दाखवून प्राथमिक उपचार देऊन दवाखान्यात केल्याने पुढील अनर्थ टळला.

सविस्तर वृत्त की,अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयात आरोपी घेऊन आलेले सहाय्यक फौजदार संजय गायकवाड यांना न्यायालयाच्या आवारातच अचानक झटका आल्याने ते खाली कोसळले. जवळच उभे असलेले ऍड दिनेश पाटील तात्काळ मदतीला धावले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला असे समजून त्यांनी त्यांना सीपीआर दिला आणि प्राथमिक उपचार करून गायकवाड यांना डॉ निखिल बहुगुणे यांच्याकडे दाखल केले. डॉ बहुगुणे यांनी त्यांच्यावर उपचार केले. दरम्यान गायकवाड यांच्या कुटुंबाला घटना कळवण्यात आली. गायकवाड यांच्या मेंदूत रक्तपुरवठा कमी झाल्याने त्यांना झटका आला असल्याचे तपासणी अंती आढळून आले. त्यांना पुढील चाचण्यांसाठी कुटुंबाने जळगाव येथे दवाखान्यात घेऊन गेले.त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असे डॉ बहुगुणे यांनी सांगितले.
