अमळनेर येथील पोलिसांनी आपल्या वरीष्टांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस रेकॉर्डवर नसलेल्या मोटरचोराला मोठ्या शिताफीने पकडले आहे.

सविस्तर वृत्त की,दिनांक. 7/2/2025 रोजी अमळनेर पोलीस स्टेशनला अजिंक्य किरण पाटील वय 27 राहणार लक्ष्मी नगर यांच्या फिर्यादवरून दिनांक 5/2/2025 रोजी दुपारी 01.45 ते 03.30 वाजे दरम्यान अमळनेर शहरातील पिंपळे रोड येथील ग.स. सोसायटीच्या पार्किंग मधून होंडा कंपनीचे युनिकॉर्न मोटरसायकल क्रमांक MH 19 DH 2311 चोरी गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली.
पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर मॅडम, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी घोलप यांच्या मार्गदर्शनाने व वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्या आदेशान्वये सदर गुन्ह्यातील मोटरसायकलच्या शोध घेण्यासाठी पथक रवाना करण्यात आले. सदर पथकातील पोलीस अंमलदार यांनी आरोपीच्या शोध घेण्यासाठी घटनास्थळापासून सीसीटीव्ही कॅमेरा तसेच गुप्त बातमीदारचा आधार घेत अमळनेर पासून नंदुरबार पर्यंत जाऊन आरोपी निष्पन्न करून त्याची गुप्त बातमीदार मार्फत माहिती काढून शोध घेऊन त्यास नंदुरबार शहरात शिताफीने पकडले. पोलिसांनी त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव धनंजय उर्फ भूषण काशिनाथ कुवर वय 31 राहणार तलवाडे पोस्ट शनिमांडळ तालुका जिल्हा नंदुरबार असे असल्याचे सांगितले आहे. आरोपीस ताब्यात घेऊन पोलीस निरीक्षक विकास देवरे यांना कळवून आरोपी ची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटरसायकल रिकव्हर करण्यात आली आहे. तसेच त्याला विश्वासात घेऊन सखोल चौकशी करता त्याने यापूर्वी दोंडाईचा रेल्वे स्टेशन येथून होंडा कंपनीची सीबी शाईन मोटरसायकल देखील चोरी केल्याची कबुली पोलीस कस्टडी रिमांड मध्ये असताना दिलेली आहे. ती देखील पोलिसांनी त्याच्याकडूनच हस्तगत केली आहे. दोंडाईचा येथे चोरी झालेल्या वाहन मालकाचा पोलीस शोध घेऊन त्यांच्या ताब्यात देण्याची कारवाई करीत आहेत. वरील आरोपी हा करायचं मोटरसायकल चोर असून यापूर्वी तो कोणत्याही पोलीस स्टेशनला मिळून आलेला नाही त्यामुळे तो रेकॉर्डवर नव्हता.
सदर कारवाई पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार, पोलीस कॉन्स्टेबल निलेश मोरे, प्रशांत पाटील, उज्वल मस्के, विनोद संदानशिव,अमोल पाटील, जितेंद्र निकुंबे,गणेश पाटील अशांनी केली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहेत.
