अमळनेर- येथील पिंपळेरोड परिसरातील महात्मा फुले काॅलनीत द्वादशीच्या पावन तिथीचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले.द्वादशीला अंबरीष महाराज यांची यात्रा भरते. या पावन पार्श्वभूमीवर नगरसेवक प्रविण गंगाराम पाटील उर्फ राजूदादा फाफोरेकर तसेच नगरसेविका सौ.योगिता पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

