निवृत्त मुख्यध्यापिका प्रमोदिनी पाटील यां राष्ट्रीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित

      अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळाच्या प्रताप हायस्कूल मधिल सेवा निवृत्त मुख्यध्यापिका प्रमोदिनी पाटील यांना दिल्ली येथील नॅशनल ऍचीवर रिकगनायझेशन फोरम टीम, झेनित इंटरनॅशनल, इंडियन गॅलेक्सी फाउंडेशन न्यू दिल्ली संस्थेतर्फे त्यांच्या कार्याची दखल घेत आदर्श शिक्षिका म्हणून सन्मानित करण्यात आले.

       सदरचा सोहळा महिला दिनाचे औचित्य साधून दि 9 मार्च रोजी दिल्ली येथील नवीन महाराष्ट्र सदन येथे पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

 


या सोहळ्यात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, सिक्कीम आसाम आणि बिहारच्या माजी राज्यपाल कमलताई गवई, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर, अमरावतीचे खासदार बलवंत वानखेडे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्याला सर्वोच्च न्यायालयाच्या मित्तल , अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या माजी अध्यक्षा सुरेखा लामतुरे उपस्थित होत्या.

श्रीमती प्रमोदिनी पाटील यांच्या बहुयामी कर्तृत्वाचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान झाल्याने त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!