अमळनेर येथील ज्येष्ठ विधी तज्ञ ॲड विजय शामराव ढिवरे यांची नोटरी म्हणून करण्यात आली निवड.

सविस्तर वृत्त की, अमळनेर येथील रहिवासी ॲड विजय ढिवरे यांनी जानेवारी 1990 पासून वकिली व्यवसायात पदार्पण केले.आज जवळपास पस्तीस वर्षे लोटली. दरम्यान त्यांनी खानदेशातील धुळे, नंदुरबार,शिरपूर, शिंदखेडा,मुक्ताईनगर, भुसावळ, पारोळा, अमळनेर आदी ठिकाणी 2001 पासून विशेष सहायक सरकारी अभियोक्ता म्हणून काम केले.तसेच पोलीस विभागात ही ते विधि अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. मोक्का सारख्या कायद्यात त्यांचा गाढा अभ्यास असल्याने त्याचा फायदा पोलिस प्रशासनाने गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसविण्यात यश संपादन केले आहे.विविध गंभीर गुन्ह्यात त्यांनी आपल्या बुद्धी कौशल्याने आरोपीस शिक्षेस पात्र ठरविण्याकामी योगदान दिले आहे.त्यांचा कायदे विषयक असलेला अभ्यास पाहता पोलिस प्रशासनातील अनेक अधिकारी व कर्मचारी त्यांचे मार्गदर्शन घेत असतात.त्यांचा या क्षेत्रातील अनुभव पाहता केंद्र सरकारच्या नोटरी सेल ने त्यांना मुलाखत घेऊन नोटरी म्हणून नुकतीच मान्यता दिली आहे.सध्या ते चोपडा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात विधि अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
नोटरी म्हणून निवड झाल्या बद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
