अमळनेर येथील शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी तालुका काँग्रेस कमिटीने अमळनेर येथे तहसील आवारात एकदिवशीय लाक्षणिक उपोषण केले. यावेळी प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

यावेळी सर्व काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते, पदाधिकारी तथा शेतकरी, शेतमजुरांची उपस्थिती होती. त्यात सर्वप्रथम लाक्षणिक उपोषण कशासाठी? यासाठीचे स्पष्टीकरणात्मक भाषण तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष बी. के. सूर्यवंशी यांनी केले. त्यात तहसीलदार अमळनेर यांना देण्यासाठी तयार केलेल्या सर्व मुद्द्यांवर मत मांडले. त्यात शेतमालाला उत्पादन खर्चानुसार भाव मिळावा. शेती अवजारे, खते, बी बियाणे यावरील कर(जीएसटी) रद्द करावा. शेतकऱ्यांना वेळेवर खते, बियाणे मिळावीत. शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा व्हावा,शेत शिवार किंवा पानंद रस्त्याचे कामे त्वरित सुरू करावीत. शेतीच्या पायाभूत सुविधांवर खर्च वाढवावा, शेतमालाला हमीभाव मान्य करून, बाजार भाव कमी असल्यास, भावातील तूट शासनाने शेतकऱ्यांना द्यावी, शेतकऱ्यांचे बांधावरचे वाद कमी करण्यासाठी, शेतजमीन मोजणी मोहीम शासनाने हाती घ्यावी, त्यात वहिवाट नमूद करावी असे शेतकऱ्यांसंबंधीचे अनेक मुद्दे मांडले. त्यानंतर बन्सीलाल भागवत यांनी शेतकऱ्यांचे अनुभव सांगितले.या उपोषणास गावरान जागल्या संघटनेचे विश्वास पाटील यांनी शेतकऱ्यांसाठीच्या लढ्याचे अनेक मुद्दे विस्तारित केले. त्यात हमीभाव व शेतकऱ्याने विकलेला भाव यातील फरक शेतकऱ्यांना शासनाने द्यावा. त्यासाठीचे प्रतिज्ञापत्र उपस्थितांना देऊन, असा फरक मिळण्यासाठी शेतकऱ्यांना न्यायालयात दाद मागण्यासाठी चा सल्ला दिला, व त्यासाठी काँग्रेस संघटनेने पुढाकार घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर अरुण देशमुख यांनी गावरान जागल्याचे कामासाठी ची रूपरेषा दिली. शहराध्यक्ष मनोज पाटील यांनी गावरान जागल्या संघटनेच्या शेतकऱ्यांच्या कामासाठी, काँग्रेसपक्ष बरोबरीने पाठपुरा करण्याचे आश्वासन दिले. व संघटनेच्या कामकाजाचे स्पष्टीकरण केले. माझी जि. प. सदस्य शांताराम पाटील यांनी, ज्ञानेश्वरी ग्रंथातील दाखले देत सरकार कोठे चालले आहे? याची उदाहरणे दिली. तसेच उपजिल्हा अध्यक्ष गोकुळ बोरसे यांनी शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य केले. शेवटी संदीप घोरपडे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्नांचे सविस्तर मुद्दे मांडले. त्यात शेतकरी अल्पभूधारक होत आहे, त्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती व इतर शैक्षणिक सुविधा मिळाल्या पाहिजेत. शेतकऱ्यांना नोकरदाराप्रमाणे आरोग्याच्या सुविधा शासनाने पुरविल्या पाहिजेत. अशा प्रकारे व त्यांनी विचार मांडल्यानंतर तहसीलदार अमळनेर यांना निवेदन दिले.
या उपोषणात शरद पाटील, गजेंद्र साळुंखे, सुलोचना वाघ, कन्हैयालाल कापडे, श्रीराम पाटील, पार्थराज पाटील, प्रवीण जैन, भिवसन पाटील, राजू भाट, रोहिदास पाटील, रोहिदास कापडे, विवेक पाटील, शालिग्राम पाटील, भगवान संधान शिव, डॉ. रवींद्र पाटील, कृष्णा पाटील, जयवंत पाटील, के.व्ही. पाटील, रामकृष्ण पाटील, साईद तेली, टुशिफ तेली, हरिभाऊ मारवाडीकर, नरेंद्र सदाशिव, विठ्ठलराव पवार, पी. वाय. पाटील, जिजाऊराव पाटील, ज्ञानेश्वर पाटील, हर्षल जाधव, तुकाराम चौधरी उपस्थित होते.
