जळगाव प्रतिनिधी, येथील मजदुर संघाच्या अखिल भारतीय केंद्रीय कार्य समिती बैठकीत झालेल्या निर्णयानुसार श्रमिक जगताच्या न्याय मागण्यासाठी दिनांक १९ सप्टेंबर २०२४, रोजी देशभर एकच वेळी मोर्चे व निदर्शने अंतर्गत जळगाव जिल्हा कलेक्टर कार्यालय व एम्प्लॉयमेंट पेन्शन स्कीम विषयात EPS कार्यालयात निवेदन देण्यात आले.

निवेदनात अश्या आहेत मागण्या….
शासकीय व निमशासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करा,आयुध निर्माण मधील कर्मचाऱ्यांना प्रसार भारती मॉडेल लागू करा,अंगणवाडी कर्मचारी,आशा कर्मचारी यांना शासकीय सेवेत सामावून घेऊन शासकीय सेवेचे लाभ द्या,घरेलू कामगारांना घरकुल योजनेचा लाभ व बी.पी.एल.कार्ड देऊन त्याचे लाभ द्या,तालुका स्थरावर बांधकाम कामगारांची नोंदनी व त्यांच्या तक्रारी निवारण करण्याची रचना करा,ग्रामपंचायतींमधील केलेली सेवा सेवानिवृत्तीचे लाभ देतांना ग्राह्य धरण्यात यावी.व अनुकंपावरील वारसा हक्काची प्रकरणे त्वरित निकाली काढण्यात यावी,नगरपरिषद,नगरपालिका, कंत्राटी कामगारांना किमान वेतनाचे लाभ देण्यात यावे,मच्छिमार बांधवांसाठी कल्याणकारी बोर्डाची स्थापना करा,वयोवृद्ध मच्छिमार बांधवांना पेन्शन योजना लागू करा,सर्व प्रकारच्या कंत्राटी कामगारांना नोकरीची शाश्वस्ती आणि ठराविक अंतराने वेतन वाढ द्या. महाराष्ट्र शासनात हरियाणा पॅटर्न लागू करा,विना अनुदानित संस्थेत काम करणाऱ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागू करा,प्रत्येक जिल्ह्यात कामगार राज्य विमा रुग्णालय सुरू करा,राष्ट्रीयकृत बँका,सहकारी बँका,विमा,संरक्षण,वीज,रेल्वे,पेट्रोलियम,परिवहन,इ.उद्योगातील खाजगीकरण थांबवा.अशा विविध मागण्यांसाठी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले .
धरणे आंदोलनास या मान्यवरांनी दिली भेट….*
धरणे आंदोलनाला जळगाव लोकसभेच्या खासदार श्रीमती.स्मिता वाघ,आमदार सुरेश भोळे,आमदार शिरीष चौधरी यांनी धरणे आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा दिला तसेच शासन स्थरावर आपला विषय घेऊन संघटनेच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन दिले.
याप्रसंगी भारतीय मजदूर संघाचे प्रभाकर बाणासुरे,जिल्हाध्यक्ष अभय वीसपुते,जिल्हा सचिव सचिन लाडवंजारी,ज्येष्ठ नागरीक संघाचे महामंत्री सुभाष भावसार, पी.जे.पाटील,सदाशिव सोनार,योगेश सूर्यवंशी,अशोक मोरे,राधा नेतले,रंजना पाटील,प्रविण मिस्तरी,विश्वास साळी,रविंद्र भोई,सुनील कोळी,किरण पाटील,विजय जगताप,अनंत जाधव,सोनाली ठाकरे,अफ्रोज खान,प्रविण शिरसाठ,संजय शिरसाठ,भगवान वाघ राहुल तायडे,विज्ञान पाटील,आर.आर.चौधरी,नितीन पाटील,महेंद्र कोळी,राहुल सपकाळे यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
आंदोलनाची सांगता निवासी जिल्हाधिकारी गजेंद्र पाटोडे,EPFO चे प्रवर्तन अधिकारी रमण पवार यांना निवेदन देऊन करण्यात आले.
