शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बौद्ध व्यक्तींची झालेली निवड त्वरित जाहीर करा…दादासाहेब शेळके 

नांदेड प्रतिनिधी, येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बौद्ध व्यक्तींची निवड होऊन सुद्धा जाहीर न करणे हा खरा जातीवाद असुन या संदर्भात लवकरच मुख्याध्यापका सह संबंधितावर ॲट्रॉसिटीची फिर्याद देणार असुन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधितांना आदेश देऊन लवकरच निवड जाहीर न केल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याही दालनात घुसण्याचे दादासाहेब शेळके यांनी दिला इशारा.

रुई धानोरा तालुका हदगाव येथील बौद्ध समाजाच्या तरुणाची शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड होऊन सुद्धा गावातील जातीवाद्याच्या विरोधाला मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांनी दबावाला बळी पडून बौद्ध व्यक्तींची निवड जाहीर केली नाही हा खरा जातीवाद असुन त्या संदर्भात पुढील आंदोलनाची दिशा लवकर ठरविण्यात येईल असे आश्वासन रुई धानोरा येथील सर्व बौद्ध समाज,मातंग समाज आणि ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांना दादासाहेब शेळके यांनी दिले. दरम्यान लवकरच टायगर सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करून संबंधीता विरोधात तक्रार देण्यात येईल असे ही आश्वासन शिष्टमंडळाला दिले .

यावेळी प्रल्हाद पडघने, दिलीपराव परघणे,सतीश वानखेडे,सतीश पवार बाबुराव हापसे,लक्ष्मणराव पडघने,भीमराव मनवर,सखाराम वाढवे,विनोद धुळे,नितीन काळे,राजू झिंजाडे,आशिष पडघने,बंटी भाऊ बळखंडे आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!