मुंबई येथील जैन मंदिर तोडल्याबइल व पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्याचा जैन बाधंवा कडून निषेध

अमळनेर येथील जैन समाज हा शांतीप्रीय समाज आहे.अहिंसावर विश्वास ठेवणारा आहे.अशा समाजवर वारंवार आघात होत असल्याची भावना अमळनेर मधील जैन बाधवानी महामहीम राष्ट्रपती यांना प्रांतधिकारी नितीन मुंडावर द्वारा निवेदन देऊन कळविले.

समाजावर होणाऱ्या अन्याय व त्रासातून शासनाने
गांभीर्याने सोडवणूक करावी म्हणून सदर निवेदनात खालील मुद्यावर लक्ष वेधले आहे…

৭) जैन साधु संतांवर होणारे हल्ले तात्काळ थांबवावे साधू संतांना वीहार यात्रेत विशेष सुरक्षा द्यावी..
२) साधू संतांच्या (वीहार) प्रवास दरम्यान अपघात होणार नाही याची विशेष काळजी घेण्यात यावी.
३) मुंबई वीले पालें येथे मुंबई महानगरपालिकेने जैन मंदिराची केलेली तोडफोडी मुळे समाजाच्या भावना तीव्र
झाल्या आहेत, ही बाब अल्पसंख्यांक समाजाला असुरक्षीत करणारी आहे, मंदिर तोडल्याजागेवर पुन्हा मंदिर उभारण्यात यावे.
४) जैन धार्मिक स्थळावर होणारे अतिक्रमण थांबवावे त्यासाठी विशेष कायदा करावा.

5) कश्मीर पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे आम्ही समस्त जैन बांधव तीव्र निषेध करीत आहोत.

जैन समाजाचे देशाच्या विकासात मोठे आर्थिक योगदान आहे. शांतीप्रिय जैन बांधवांना शासनाकड़ून सुरक्षेची गरज असल्याने आमच्या वरील मागण्यांकडे गांभीयने लक्ष द्यावे, आदी मागण्या निवेदना द्वारे करण्यात आले आहे.

याप्रसंगी राजकुमार छाजेड, महेंद्र कोठारी, डॉ राजेंद्र जैन, घेवरचंदणी कोठारी, प्रवीण जैन, विजय जैन, डॉ संजय शहा, संजय गोलेच्छा, राजेंद्र जैन, प्रा अरुण कोचर, प्रा एस डी ओसवाल, प्रकाश छाजेड आदी जैन बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!