नंदुरबार : येथील MKD नर्सिंग कॉलेजमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांवर होत असलेल्या गंभीर अन्यायाविरोधात आणि अमानुष छळाविरोधात ‘NSUI’ (नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया) च्या शिष्टमंडळाने आक्रमक पाऊल उचलले आहे. पीडित आदिवासी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन शिष्टमंडळाने आज राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. हसन मुश्रीफ यांची भेट घेतली व त्यांना या धक्कादायक प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निवेदन दिले. संबंधित महाविद्यालय हे शिंदे सेनेचे आमदार किशोर दराडे यांच्याशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे.

