पाणीपट्टी वरील २% व्याज हि जनतेची लुट असुन ते रद्द करण्यात यावी– उबाठा शिवसेना

अमळनेर शहरातील जनतेला नगरपरिषद ने लावलेल्या पाणीपट्टी वरील २% व्याज हि जनतेची लुट असुन ते रद्द करण्यात यावी असे उबाठा शिवसेना वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

अमळनेर नगरपरिषद ने जनतेला पुन्हा वेठीस धरले असुन पाणीपट्टीवर दरमहा २% व्याज हे रद्द करण्यात यावी या मागणीसाठी अमळनेर शहर शिवसेना वतीने मा. मुख्याधिकारी सो यांना निवेदन देण्यात आले.

निवेदन देताना शिवसेना शहरप्रमुख चंद्रशेखर भावसार शिवसेना तालुकाप्रमुख मा.श्रीकांत पाटील मा.उपजिल्हाप्रमुख देवेंद्र देशमुख शहर संघटक मोहन भोई युवासेना तालुकाप्रमुख राजेंद्र मराठे विधान सभा क्षेत्र प्रमुख बाळासाहेब पवार उपतालुकाप्रमुख विलासराव पवार शाखाप्रमुख महेश सुतार गणेश वाघ हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!