*|| रानटी समाज ||*
*रानटी समाज | क्रुतघ्नता भारी |*
*हत्त्या झाल्यावरी || रागदारी || १||*
*जगभरी दादा | हाचिरे रिवाज |*
*सत्तामत्ता माज | रानवटा || २||*
*मृत्युचाच धाक |सत्ताधार-या भारी |*
*तानाशाही करी | अत्याचार || ३||*
*होलिकाचि बोंब | चाले तीन दिन |*
*हत्त्यारा जिंकून | जातो तेव्हा || 4||*
*भगवान येशु || सुळावरी दिले |*
*गांधिजिं मारिले ।क्रुरतेने ।।5||*
*पिडित हे जन | पिडित राहती |*
*पुन्हा ह्याचि रिती । भक्षस्थानि ।।6||*
*शिबा म्हणे शुध्द | लोकशाही तारी |*
*सुखाचि भाकरी । सर्वलोका ।।7||*
*===================*
*|| निर्भंगावल ||*
( *शिवाजी पाटील* )मो.+91 92606 45164
