अमळनेर,”मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा केवळ एका कुटुंबाचा नसून संपूर्ण समाजाचा आहे. या अन्यायाविरुद्ध आता ठोस लढा उभारला जाईल,” असा निर्धार जळगाव जिल्हा एकता संघटनेचे समन्वयक फारुक शेख यांनी व्यक्त केला आहे.

धार (ता. अमळनेर) येथील एका अल्पसंख्यांक मुलीला दुसऱ्या समाजातील मुलाने संगनमत करून पळवून नेल्याची गंभीर घटना समोर आली असून, या प्रकरणात पोलिसांनी कडक कारवाई करावी या मागणीसाठी एकता संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
मुलीच्या भावाने २३ मार्च २०२६ रोजी मारवड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, मुलगी घरातून जाताना गळ्यातील १२ ग्रॅम सोन्याची चैन आणि लग्नातील ६० हजार रुपये रोख घेऊन गेली आहे. हा प्रकार केवळ प्रेमप्रकरण किंवा पळवून नेण्यापुरता मर्यादित नसून, हे संगनमताने केलेले अपहरण, फसवणूक आणि चोरी असल्याचे संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, पोलिसांनी केवळ ‘मिसिंग’ (गहाळ) तक्रार नोंदवून घेतल्याने कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून फारुक शेख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अमळनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) विनायक कोते यांची भेट घेतली.
यावेळी संघटनेने खालील प्रमुख मागण्या मांडल्या:
तात्काळ शोध: मुलीचा शोध घेऊन तिला त्वरित कुटुंबाच्या ताब्यात द्यावे, आरोपी राकेश अनिल पाटील याच्याविरुद्ध अपहरण आणि चोरीचे गुन्हे दाखल करावेत,केवळ मिसिंग तक्रार न ठेवता, सखोल तपासाअंती कठोर कायदेशीर पावले उचलावीत.
पोलीस प्रशासनाचे आश्वासन: डीवायएसपी विनायक कोलते यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेत, “दोन दिवसांत सखोल चौकशी करून आवश्यक ती कठोर कारवाई करू,” असे आश्वासन दिले आहे.
यावेळी फारुक शेख यांच्यासोबत हाजी नासिर, नगरसेवक नविद शेख, ॲड. साजिद शेख, व्ही. एम. मुजावर, अजहर अली, गुलाम नबी पठाण, समीर मुजावर (फिर्यादी) आणि मोठ्या संख्येने समाजसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.
“अन्याय सहन केला जाणार नाही! जोपर्यंत मुलीला न्याय मिळत नाही आणि दोषींवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील.”
— एकता संघटना
