अमळनेर येथील लोकमान्य टिळक शाळेतील शिक्षक भूषण महाले यांचा जळगाव जिल्ह्यात तंबाखू मुक्त शाळा व तंबाखू मुक्त अभियान कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल सत्कार करण्यात आला .

या प्रसंगी सलाम मुंबई फाउंडेशन चे अधिकारी राकेश कासारे, तंबाखू जनजागृती करणारे शिक्षक राज मोहम्मद, आधार संस्थेचे समन्वयक दिपक संदानशिव , मुरलीधर बिरारी, दीपक विश्वेश्वर, तोसीफ शेख तसेच लोकमान्य टिळक शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समवेत भूषण महाले यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
