अमळनेर : येथील रेल्वे स्टेशन परिसरातील हॉलीबॉल ग्राऊंडवर रविवार, दि. ३ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता एका भव्य ‘जाहीर प्रबोधन सभेचे’ आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे तसेच कामगार दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

