अमळनेर पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कारांचे वितरण; महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा……आमदार अनिल पाटील व खासदार स्मिता वाघ यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न

अमळनेर :येथील पंचायत समिती शिक्षण विभाग (जिल्हा परिषद, जळगाव) वतीने १ मे ‘महाराष्ट्र दिन’ मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. या औचित्याने तालुक्यातील गुणवंत शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले, तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप व खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

जी. एस. हायस्कूलच्या हॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील आणि जळगाव लोकसभा क्षेत्राच्या खासदार स्मिताताई वाघ या होत्या. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी सामूहिक ‘महाराष्ट्र गीत’ गायले गेले.

गुणवंतांचा गौरव आणि साहित्य वाटप

गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील यांनी प्रास्ताविकात शिक्षण विभागाच्या उपक्रमांची माहिती दिली. सन २०२५-२६ या वर्षासाठी निवड झालेल्या ११ आदर्श शिक्षकांना सन्मानचिन्ह, शाल, प्रमाणपत्र आणि बुके देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणाऱ्या खेळाडूंचाही विशेष गौरव करण्यात आला.

पुरस्कार प्राप्त शिक्षक:

१) श्रीमती मनिषा पाटील (जि.प. शाळा, सडावण)

२) सौ. सिमा सूर्यवंशी (मुख्याध्यापिका, डी. आर. कन्या शाळा)

३) श्रीमती अनिता बोरसे (साने गुरुजी कन्या शाळा)

४) श्री. भैय्यासाहेब साळुंखे (जि.प. शाळा, गडखांब)

५) श्रीमती रोहिणी बडगुजर (जि.प. शाळा, मुडी)

६) श्रीमती सुवर्णा वाणी (जि.प. शाळा, मेहरगाव)

७) श्री. प्रभाकर पाटील (जि.प. शाळा, चिमणपुरी)

८) श्री. अनिल चौधरी (माध्यमिक विद्यालय, निम)

९) श्री. बापुराव सांगोरे (माध्यमिक आश्रम शाळा, रणाईचे)

१०) श्री. आनंदा धनगर (माध्यमिक शाळा, करणखेडा)

११) श्रीमती शोभा कसबे (डी. आर. कन्या शाळा)

मान्यवरांची उपस्थिती

  मंचावर खा.शि.मं. मुख्याध्यापक प्रतिनिधी बाळासाहेब विनोद कदम, गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील, केंद्रप्रमुख चंद्रकांत पाटील (अमळगाव), रवींद्र पाटील (चिमणपुरी), अशोक सोनवणे (शहापूर) आणि तालुका क्रीडा अध्यक्ष एस. पी. वाघ उपस्थित होते.

हा शासकीय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचायत समिती शिक्षण विभागाचे सॅम शिंगाणे, कमलेश मोरे, सुनील करंदीकर, सचिन वाघ आणि भूपेंद्र शिरसाठ यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला तालुक्यातील शिक्षक, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!