अमळनेर: प्रभाग क्रमांक ८ मधील सर्व मतदारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आणीबाणीची बातमी आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार प्रभागातील मतदारांसाठी ‘मतदार नोंदणी महामेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. सर्व नागरिकांना ‘इनाोम्रेशन फॉर्म’ (माहिती अर्ज) भरणे अनिवार्य करण्यात आले असून, तसे न केल्यास मतदार यादीतून नाव बाद होण्याची किंवा नवीन नाव समाविष्ट न होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या मोहिमेत प्रभागातील ‘बीएलओ’ (BLO) द्वारे थेट अर्ज भरून घेतले जाणार आहेत.

