अमळनेर: रस्ते अपघातातील जखमींना ‘सुवर्णक्षणात’ (Golden Hour) तातडीची वैद्यकीय मदत मिळावी आणि अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे, या उदात्त उद्देशाने जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या ‘झिरो फॅटॅलिटी कॉन्सेप्ट’ उपक्रमाला लायन्स क्लब, अमळनेरच्या वतीने मोलाचा हातभार लावण्यात आला आहे. क्लबच्या वतीने अमळनेर शहर पोलीस ठाण्यास दोन फोल्डेबल स्ट्रेचर आणि दोन फर्स्ट एड किट बॉक्स भेट देण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या प्रमुख उपस्थितीत हा स्तुत्य उपक्रम पार पडला.

