अमळनेर: देशभरात गाजत असलेल्या पेपर लीक प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतर-मंतर येथे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी ज्येष्ठ वैज्ञानिक सोनम वांगचुक यांचे उपोषण सुरू होते. मात्र, हे उपोषण भाजप सरकारने बळाचा वापर करून दडपल्याचा आणि उपोषण मंडपातून त्यांना सक्तीने उचलून नेल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच, या घटनेचा निषेध करणाऱ्या अभिजीत दिपके यांना मारहाण करून त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. या हुकूमशाही प्रवृत्तीचा आणि सरकारच्या निष्क्रियतेचा तीव्र निषेध करण्यासाठी उद्या, सोमवार दिनांक २० जुलै २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता अमळनेर शहरात भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

