अमळनेर: शासनाच्या विशेष योजनेतून प्रभाग क्रमांक १ मध्ये मारवड रस्ता ते विप्रो कंपनी, तांबेपुरापर्यंत २०० लक्ष (२ कोटी) रुपयांचा सिमेंट कॉंक्रिटीकरणाचा रस्ता मंजूर झाला आहे. मात्र, सध्या या रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत असल्याने वाहनधारकांच्या वर्दळीमुळे परिसरात धुळीचे प्रचंड लोट उसळत आहेत. याचा सर्वाधिक फटका रामवाडी आणि तांबेपुरा परिसरातील रहिवाशांना बसत असून लोकांच्या घरात आता केवळ ‘धुळीचे साम्राज्य’ पाहायला मिळत आहे.

