आदिवासी क्रांती दल संघटनेचे संपर्क कार्यालय फलक अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न..

अमळनेर शहरातील ताडेपुरा भागात आदिवासींच्या हक्कांसाठी आदिवासी क्रांती दल या सामाजिक संघटनेचे फलक अनावरण व कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी नाशिक आदिवासी विभाग सहाय्यक आयुक्त कपिल पवार यांनी सांगितले की, आदिवासी समाजासाठी विविध योजना प्रकल्प सरकार मार्फत राबवली जात असून, त्यासाठी आपण जनजागृती केली पाहिजे, समाजातील शिक्षित तरुणांनी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी कटिबद्ध झाले पाहिजे,तसेच आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊन त्यांना चांगल्या पदावर पोहोचवले पाहिजे, वाचनालय सुरू केले पाहिजे, काही गरज भासल्यास माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले.

आदिवासी क्रांती दल या सामाजिक संघटनेचे फलक अनावरण व कार्यालयाचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष मा.बाबा बोरसे,नाशिक सहाय्यक आयुक्त आदिवासी विकास विभाग कपिल पवार , डॉ. अनिल शिंदे, ऍड ललिता पाटील, रियाज मौलाना, सामाजिक कार्यकर्ते किरण बहारे, अर्जुन संदानशिव, प्रविण बैसाणे, राजू बापू चौधरी, धुळे एपीआय गणेश पवार, तसेच संघटनेचे तालुकाध्यक्ष आप्पा दाभाडे, गोरख बाबा साळुंखे, संतोष संदानशिव, एड. शिवकुमार ससाने, यांच्या हस्ते करण्यात आले.

सदर कार्यक्रमात मोठ्या संख्येने परिसरातील महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन एड. शेखर खैरनार यांनी केले. तर आभार संघटनेच्या तालुकाध्यक्ष आप्पा दाभाडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!