सराईत मोटरसायकल चोर अमळनेर पोलिसांच्या जाळ्यात.

अमळनेर येथील पोलिसांनी मोटर सायकल सह इतर वाहन चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास मोठ्या शिताफिने अटक करण्यात यश मिळविले आहे.

दिनांक 01/03/2025 रोजी 18.45 वाजता अमळनेर शहरात बडोदा बँकेजवळ विघ्नहर्ता हॉस्पिटल जवळ लावलेली असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने कमलाकर लोटन पाटील राहणार वावळे तालुका अमळनेर यांची स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक MH 19 DW 2392 हि चोरून नेली होती त्यावरून अंमळनेर पोलीस स्टेशनला दिनांक 5/3/2025 रोजी अज्ञात आरोपीताच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 303(२) प्रमाणे फिर्याद दाखल करण्यात आली होती.

संत सखाराम महाराज यात्रोत्सव चालू असताना पोलीस निरीक्षक साहेबांनी अमळनेर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकास सदर मोटरसायकल चोरी बाबत माहिती संकलित करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन व सूचना दिल्या.

त्यावरून गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार, पोलीस कॉन्स्टेबल निलेश मोरे, प्रशांत पाटील, विनोद संंदानशिव, उज्वल मस्के आदींनी गोपनीय माहिती काढून सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून सदर मोटरसायकल चोरणारा आरोपी नामे भैय्या उर्फ तुषार शालिग्राम वाकडे (कोळी) राहणार मळसर तालुका शिरपूर जिल्हा धुळे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सदर गुन्ह्यातील चोरी केलेली मोटरसायकल हस्तगतकेली. त्याला न्यायालयाने चार दिवस पोलीस कस्टडी सुनावली आहे. वरील आरोपी याने अमळनेर सह मारवाड, शिरपूर, नंदुरबार, नरडाणा या ठिकाणी मोटरसायकल व ट्रॅक्टर चोरीचे गुन्हे केले असल्याचे समजून आले आहे. वरील गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक साळुंखे करीत आहेत.

 

अमळनेर पोलीस स्टेशन हद्दीत चोरीच्या घटना उघडकीस येणे संदर्भात नागरिकांना कोणतीही माहिती मिळून आल्यास त्यांनी कृपया पोलिसांची संपर्क साधावा. आपले नाव व दिलेली माहिती गोपनीय ठेवण्यात येईल याची शाश्वती यावेळी माननीय पोलीस निरीक्षण श्री दत्तात्रय निकम साहेब यांनी दिली.

सध्या चोरी करण्याच्या वेगवेगळ्या प्रकारची पद्धती चोर अवलंबित असतात त्यामुळे नागरिकांनी आपल्या मालमत्तेचे नुकसान होणार नाही चोरी होणार नाही याबाबत सतर्क राहण्याचा देखील सूचना दिलेल्या आहे. शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे देखील आवाहन यावेळी करण्यात आलेले आहे.

एक कॅमेरा पोलिसांसाठी संकल्पना अंतर्गत नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे. एक कॅमेरा रोडच्या दिशेने रोडवरील सीन कॅमेरा मध्ये दिसेल अशा पद्धतीने लावण्यात यावा जेणेकरून चोरीची मालमत्ता मदत होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!