अमळनेर येथील एका फळ विक्रेत्याचे घरे फोडून चोरट्यानी रोख रकमेसह सोन्याचे दागिने ऐवज चोरून नेल्याची घटना घडली.
सविस्तर वृत्त की, शहरातील फळ विक्रेते सादिक बाबूलाल बागवान व त्यांची पत्नी हे दि २० रोजी हज यात्रेला जाण्यासाठी त्यांचे भाऊ फारुख बाबूलाल बागवान व नातेवाईक देखील त्यांना मुंबई पर्यंत सोडण्यासाठी सोबत गेले होते तर मुलगा रिहान ची जळगाव येथे पेपर असल्याने तो घराला कुलूप लावून जळगाव गेला.मात्र रिहान घरी परत आला असता त्याच्या घराचे कुलुप तोडलेले दिसले. घरात जाऊन पाहिले असता घरातील सर्व सामान कपाटातील कपडे ,वस्तू अस्ताव्यस्त फेकलेले दिसून आले.फळ विक्रेते सादिकचा भाऊ फारुख एकाच इमारतीत राहत असल्याने वरच्या मजल्यावरच्या कपाटातील साहित्य देखील फेकण्यात आल्याचे आढळून आले.विशेष म्हणजे सदर घर हे भर वस्तीतील निमुळत्या गल्लीत असूनही ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
सदर घटनेची माहिती पोलिसांना कळविल्याने पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम , सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे हेकॉ गणेश पाटील , मिलिंद सोनार ,अमोल पाटील , विनोद , निलेश मोरे ,जितेंद्र निकुंभे यांनी घटना स्थळी भेट देऊन पंचनामा केला.श्वान पथक सह फॉरेन्सिक टीमला पाचरण करण्यात आले. श्वान पथकाला चोरट्यांचा मार्ग सापडला नाही. मात्र ठसे तज्ज्ञांनी वस्तूंवरचे ठसे नमुने घेतले आहेत.
घरमालकांनी रोख रकमेसह सोन्याचांदीचे दागिने असा लाखो रुपयांचा माल चोरीस गेल्याचे दावा केला आहे.मात्र सदर घटनेची तक्रार पोलीस ठाण्यात फळ विक्रेते सादिक चा भाऊ फारुख मुंबईहून परत आल्या नंतर नोंदविण्यात येणार असल्याचे समजते. तत्पूर्वी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज बघून चोरीचा तपास सुरू केला आहे.
