ऍड सागर ढिवरे व ऍड अविनाश खैरनार यानीं एलएलएम परीक्षेत मिळविले यश…. दोघ मित्रांचे सर्वत्र होत आहे कौतुक व अभिनंदन 

अमळनेर येथील ऍड सागर ढिवरे व ऍड अविनाश खैरनार यांनी विधी शाखेतील एलएलएम परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात मिळविले यश.

सविस्तर वृत्त की, अमळनेर शहरातील ज्येष्ठ विधी तज्ञ् ऍड विजय ढिवरे व नरडाणा कॉलेज चे प्राध्यापक विजय भोजू खैरनार या जिवलग मित्रांच्या मुलांनी अर्थात सागर व अविनाश यांनी सोबतच पदवी पर्यंत चे शिक्षण घेतले.नंतर या दोघांनी ऍड विजय ढिवरे यांच्या सल्ल्याने धुळे येथील विधी कॉलेज मध्ये प्रवेश घेतला व अथक परीक्षम घेऊन दोघांनी विधी शाखेतील LLB ही पदवी मिळविली. मात्र येथेच नथांबता त्यांनी पुढील शिक्षणाची जिद्द कायम ठेवून LLM साठी प्रवेश घेतला. दरम्यान त्यांनी अमळनेर येथील न्यायलयात ज्येष्ठ विधी तज्ञाच्या मार्गदर्शना खाली सरावं सुद्धा सुरु केला. मात्र दोघांनी अभ्यासत कसूर नकरता LLM ही परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास झाले. या यशा बद्दल परिसरातील अनेकांनी त्यांचे कौतुक करून अभिनंदन ही केले.

ऍड सागर व ऍड अविनाश यांनी भविष्यात MPSC परीक्षा देऊन न्यायाधिक्ष होऊन योग्य प्रकारे संविधानावर आधारीत न्यायदान करून लोकशाही जपणार असल्याचे करडी नजर न्यूज ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

करडी नजर न्यूज चे मुख संपादक तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष डॉ विजय गाढे, खोपरपाट चे माजी सरपंच भाऊसाहेब उत्तमसिंग पाटील, धुळे अंबोडे गावचे उद्योजक आप्पासाहेब राजेंद्र पाटील, नंदूरबार न पा चे आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण, नरडाणा येथील कॉलेजचे संचालक बाबासाहेब संजय मधुकर शिसोदे, ज्येष्ठ विधी तज्ज्ञ ऍड राजेंद्र निकम,सामाजिक कार्यकर्ते योगराज संदानशिव,डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र संदानशिव,अर्जुन संदानशिव, किरण बहारे, नरडाणा कॉलेजचे प्राध्यापक डॉ देविदास पारधी, अमळनेर न्यायलय बार कॉन्सिल चे सर्व सदस्य आदींनी दोघांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!