पिळोदे येथील पोलिस पाटील सौ.लक्ष्मी जगदीश शिंदे यांना उत्कृष्ठ पोलीस पाटील पुरस्कार

 

अमळनेर प्रतिनिधी,जळगाव जिल्ह्यातील जिल्हाधिकारी मा. आयुष प्रसाद साहेब यांनी 15 ऑगस्ट दिनाचे अवचीत्य साधून जिल्ह्यातील महसुल विभागात उत्कृष्ठ कामगिरी करणारे अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान सत्कार करण्यात आल.त्यात उपविभागीय कार्यालय अमळनेर या विभागातून अमळनेर तालुक्यातील पिळोदे गावातील पोलीस पाटील.सौ.लक्ष्मी जगदीश शिंदे यांना उत्कृष्ठ पोलीस पाटील पुरस्कार देऊन मा. पालकमंत्री श्री.गुलाबरावजी पाटील आणि जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री.आयुष प्रसाद साहेब यांच्या हस्ते उत्कृष्ट पोलीस पाटील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी यांना अशा उपक्रमामुळे प्रोहत्सहान मिळते आणि अधिक जिद्दीने आणि प्रमाणिक काम करण्यासाठी स्फूर्ती मिळते.

सौ.लक्ष्मी जगदीश शिंदे यांचे सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.गावातील सरपच,उपसरपच,ग्रामसेववक, ग्रामस्थ यानी अभिनदंन केले व भावी वाटचालिस शुभेच्छा दिल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!