आकाश गव्हाणे यांना अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी

 

अमळनेर येथील अयोध्या नगर येथील रहिवासी तसेच सौरभ फोटो स्टुडिओचे संचालक किशोर गव्हाणे यांचे जेष्ठ चिरंजीव आकाश किशोर गव्हाणे यांनी अर्थशास्त्र या विषयात पीएच.डी. पदवी यशस्वीरित्या प्राप्त केली आहे. त्यांनी जे जे टी युनिव्हर्सिटी राजस्थान येथून ही पदवी संपादन केली असून, त्यांचे संशोधन कार्य डॉ. शिव कुमार व प्रा.डॉ. अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले.

आकाश गव्हाणे यांनी प्रताप कॉलेज, अमळनेर येथून 2021 मध्ये एम.ए. (अर्थशास्त्र) पदवी प्रथम श्रेणीत संपादन केली होती. त्यानंतर त्यांनी उच्च शिक्षणासाठी जे जे टी युनिव्हर्सिटी गाठून पीएच.डी.च्या दिशेने प्रवास सुरू केला. कठोर परिश्रम, अभ्यासातील चिकाटी आणि संशोधनातील निष्ठा यांच्या जोरावर त्यांनी अर्थशास्त्रासारख्या आव्हानात्मक विषयात उल्लेखनीय यश संपादन केले.

नागरिक आणि विविध सामाजिक संस्थांनी आकाश यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!