सर्वे ऑफ इंडिया डेहराडून ग्रामविकास मंत्रालय सर्वेक्षणात अमळनेर भूमी अभिलेख कार्यालय प्रथम….

अमळनेर, मा जिल्हाधिकारी जळगाव यांचे कडून नियोजन भवन जळगाव येथे झालेल्या सत्कार समारंभ कार्यक्रमात सर्वे ऑफ इंडिया डेहराडून ग्रामविकास मंत्रालय व जमाबंदी आयुक्त कार्यालय भूमी अभिलेख यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या स्वामित्व योजना कार्यक्रम यास जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख श्री एम पी मगर साहेब यांच्या मार्गदर्शनाने स्वामित्व योजनेअंतर्गत ग्राउंड टूथिंग केलेली गावे 100, स्वामित्व योजनेअंतर्गत सीएम अपलोड केलेली गावे 127,स्वामीत्व योजनेअंतर्गत इ आर अपलोड केलेली गावे 111 ,या विषयांमध्ये उल्लेखनीय कामकाज केल्याबद्दल उपअधीक्षक भूमी अभिलेख अमळनेर कार्यालयाला प्रथम बक्षीस मिळाले आहे

तसेच श्रीमती स्मिता गावित श्री मनोज चव्हाण श्री संजय कुमावत श्री आशिष गिरी श्री सुशांत अहिरे यांना उल्लेखनीय कामकाज केल्याबद्दल सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

 

श्रीमती स्मिता गावित,उपअधिक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, अमळनेर —

जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख जळगाव श्री मुकुदराव परशुराम मगर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्वावित्व योजना अंतर्गत अमळनेर तालुक्यातील 135 गाव यांना योजना लागू झाली असून 90 गावांचे सनदा तयार झाले आहेत.त्यापैकी 35 गावांच्या सनदा कार्यालयास प्राप्त झाले असून पाच गावांच्या सनदा वाटप झाल्या आहेत.32 गावांच्या सनदा वाटपावर आहेत. त्यासाठी कार्यालयाचा दौरा कार्यक्रम तयार करण्यात प्रगतीवर आहे, यां गोष्टीची दखल घेतला सर्वे ऑफ इंडिया डेहाराडून ग्रामविकास मंत्रालय व जमाबंदी आयुक्त आयुक्त कार्यालय भूमी अभिलेख यांनी अमळनेर भूमी अभिलेख कार्यालयास प्रथम क्रमांकाचे बक्षीस दिल्याने अत्यानंद होत आहे. या श्रेयात कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा सिंहाचा वाटा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!