अमळनेर येथे घरगुती सिलिंडर मधील गॅस खाजगी वाहनात भरणाऱ्यावर पोलिसांनी धाड टाकून चौघानां ताब्यात घेऊन तब्बल ३८ गॅस सिलिंडर जप्त केले .

सविस्तर वृत्त की, अनेक खाजगी वाहने हे वाहतुकी साठी खाजगी गॅस सिलेंडर चा वापर करीत असल्याचे परी. डीवायएसपी केदार बारबोले यांना माहिती मिळताच त्यांनी आपले सहकारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलिस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार, प्रशांत पाटील, विनोद संदानशीव, उज्वल म्हसके, नितीन कापडणे आदीनां योग्य ती कारवाई बाबत मार्गदर्शन करून शहरातील श्रीकृष्ण कॉलनीतील घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करून वाहनांमध्ये अवैधरित्या गॅस भरले जातं असल्याचे कळताच पोलिसांनी दि १७ रोजी रात्री आठ वाजेच्या दरम्यान सदर ठिकाणी धाड टाकली असता त्यांना सदर ठिकाणी एमएच ४३, एएन ११७४ नंबरच्या वाहनात इलेक्ट्रिक पंपाद्वारे घरगुती सिलिंडर मध्ये गॅस भरला जात असल्याचे आढळून आले. या वेळी पोलिसांनी धनंजय प्रभाकर पाटील (वय ४८ रा. श्रीकृष्ण कॉलनी) आणि अमोल सुभाष बोरसे (वय ३७, रा. धार, ता. अमळनेर) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या जवळून १ लाख ५० हजार रुपयांची चारचाकी, ८ हजार रुपयांचे भारत गॅस चे ४ सीलबंद सिलिंडर, ११ हजार रुपये किमतीचे भारत गॅस चे ११ खाली सिलिंडर, ३ हजार रुपये किमतीचे एचपी गॅसचे ३ खाली सिलिंडर, २० हजार रुपये किमतीचा गॅस भरण्याचा इलेक्ट्रिक पंप व नळ्या जप्त केल्या.
तर दुसऱ्या कारवाईत दि २२ रोजी दुपारी १२ वाजता पाचपावली मंदिर परिसरात जयदीप ऑटो गॅरेज मागे ही अवैधरित्या खाजगी वाहनात गॅस भरला जात असल्याचे कळताच पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकत तेथे दोघे जन आढळून आल्याने पोलिसांनी जयेश संजय साळी (वय २७, रा. शिरूड नाका अमळनेर), चंदन प्रल्हाद साळी (वय ४५, रा. रामेश्वर नगर शिरूड नाका) यांना वाहनात गॅस भरताना रंगेहात पकडले. त्यांच्याजवळून १४ हजार रुपये किमतीचे ७ भरलेले गॅस सिलिंडर, ६ हजार रुपये किमतीचे भारत गॅसचे खाली सिलिंडर, १० हजार रुपये किमतीचे एचपीगॅसचे १० खाली सिलिंडर, १० हजार रुपये किमतीचा गॅस भरण्याचा इलेक्ट्रिक पंप असे एकूण ४० हजार रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले.
गॅस वितरकावर कारवाई होणार ?
एच पी आणि भारत गॅस कंपनीचे तब्बल ३८ गॅस सिलिंडर या दोन्ही कारवाईत जप्त करण्यात आले. यापूर्वीही अवैधरित्या खाजगी वाहनात घरगुती गॅस भरनाऱ्यावर कारवाई झाल्या आहेत.मात्र हा धंदा काही केल्या थांबत नाही. याबाबत गॅस वितरकांवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.त्यांच्या वर ही कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशी चर्चा सुज्ञ नागरिक करीत आहे.
परी. डीवायएसपी बारबोले यांच्या कडून नागरिकांच्या वाढल्या अपेक्षा….

परीक्षाविधीन कार्यकाल म्हणून अमळनेर पोलीस ठाण्यात डीवायएसपी केदार बारबोले यांची इन्चार्ज म्हणून तीन महिन्याकरिता नियुक्ती झाली आणि अमळनेर मधील गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली. त्यांनी पदभार स्वीकारताच शहरातील अवैध धंदे पूर्ती बंद केली. शहरात चालणारे पत्ता, सट्टा क्लब पूर्णतः बंद केले, तसेच इतर छोटे मोठे अवैध धंदे सुद्धा बंद केल्याने गुन्हेगारीला आळा बसला. तसेच आपल्या वरिष्ठ्यांच्या मार्गदर्शना खाली बुद्धी कौशल्यावर आपले सहकारी पोलीस अधिकारी -कर्मचारी यांच्या सहकार्याने अनेक गुन्ह्यांचा तपास करून त्यातील आरोपीना पकडून जेल मध्ये रवानगी केली असल्याने अमळनेरला एक सक्षम अधिकारी म्हणून अनुभवाला मिळत आहे. म्हणून संताचे अमळनेर गुन्हेगारी व अवैध धंदे मुक्त व्हावे म्हणून नागरिकांच्या अपेक्षा त्यांच्या कडून वाढल्या आहेत. घरगुती गॅस सिलिंडर खाजगी वाहनात भरून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या सह एजन्सी घेतलेल्या गॅस वितरकांवर ही कडक कारवाई व्हावी म्हणून सुज्ञ नागरिक मागणी करीत आहे.
