अमळनेरमध्ये पत्रकाराला अडवल्याची व धमकी दिल्याची तक्रार; कारवाईची मागणी मोटारसायकलची चावी घेतल्याचा आणि सार्वजनिक ठिकाणी अपमान केल्याचा तक्रारदाराचा दावा

     अमळनेर, दि. १३ ऑक्टोबर : द लोक न्यूज वेब पोर्टलचे मुख्य संपादक संभाजी सुकलाल देवरे यांनी महेंद्र शालीग्राम बोरसे यांच्याविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. या प्रकरणाची चौकशी करून नियमानुसार कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

       तक्रारीत नमूद केल्यानुसार, १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे ६ ते ६.३० वाजेदरम्यान संभाजी देवरे हे मोटारसायकलने जात असताना अमळनेर शहरातील न्यू प्लॉट परिसरात बजरंग बन्सीलाल अग्रवाल यांच्या घरासमोर एका व्यक्तीने त्यांचा रस्ता अडवून मोटारसायकलची चावी घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी आणि अंगावर धावून येण्याचा प्रकार घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

      याशिवाय, सार्वजनिक ठिकाणी ‘खंडणीखोर पत्रकार’ असे संबोधून आपल्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य करण्यात आल्याचा आरोपही देवरे यांनी केला आहे. संबंधित व्यक्तीने सोबतच्या एका व्यक्तीला संभाषणाचे चित्रीकरण करण्यास सांगितले, तसेच घटनास्थळी सुमारे ३० ते ४० लोक जमल्याचे तक्रारीत नमूद आहे.

        या प्रकरणी लागू असलेल्या कायदेशीर तरतुदींनुसार चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. तक्रारीची प्रत जळगावचे पोलीस अधीक्षक आणि अमळनेर विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनाही पाठविण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!