विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत क्रीडा व कलागुणांची जोपासना करावी : शिक्षण महर्षी विजय नवल पाटील यांचे आवाहन

माळशेवगे : विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता अभ्यासाबरोबरच क्रीडा, विविध छंद आणि सहशालेय उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन आपला सर्वांगीण विकास साधावा, असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी विजय नवल पाटील यांनी केले. माध्यमिक विद्यालय माळशेवगे येथे आयोजित सदिच्छा भेट व मार्गदर्शनपर कार्यक्रमात ते बोलत होते.

      विजय पाटील यांनी विद्यालयाला भेट देऊन थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना भावी वाटचालीसाठी मोलाचे मार्गदर्शन केले. या भेटीदरम्यान त्यांनी शालेय परिसराची पाहणी केली. विद्यालयातील स्वच्छता, देखणी रंगरंगोटी आणि विशेषतः १५० हून अधिक झाडांची यशस्वी लागवड करून त्यांचे केलेले संवर्धन पाहून त्यांनी मनस्वी समाधान व आनंद व्यक्त केला.

       विद्यालयाच्या शेरे बुक मध्ये कौतुकास्पद अभिप्राय नोंदवत त्यांनी शाळेच्या प्रगतीची दखल घेतली व भविष्यातील वाटचालीसाठी उपयुक्त सूचना केल्या. त्यानंतर त्यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची विशेष बैठक घेतली. या बैठकीत शैक्षणिक गुणवत्तावाढ, अध्ययन-अध्यापनातील आधुनिकता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करून त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.

      या कार्यक्रमास गावचे सरपंच, माजी सरपंच, शालेय समितीचे अध्यक्ष, गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सदिच्छा भेटीमुळे शाळेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यालयाच्या पुढील वाटचालीस नवी प्रेरणा व ऊर्जा लाभली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!