कसून तयारी,नियमित सराव,वेळेचे व्यवस्थापनामुळे स्पर्धा परीक्षेत यश- युनिकचे मिलिंद पाटील

अमळनेर येथिल खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज(स्वायत्त) अंतर्गत रुसा,आयक्यूएसी,करिअर कौंसेलिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 15 दिवसीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कोर्से मध्ये तीस-या दिवसाचे मार्गदर्शन युनिकचे मिलिंद पाटील यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत CSAT पेपरवर अंत्यत अभ्यासपूर्ण माहिती दिली.मिलिंद पाटील यांनी संघ लोकसेवा आयोगात विचारलेल्या आणि संभाव्य स्वरूपाच्या प्रश्नांची सोडवणूक कसे करावे ? प्रश्न कशा पद्धतीने समजून घ्यावे ? सूत्र व साध्या पद्धतीने प्रश्न सोडविण्याचे कौशल्य कसे आत्मसात करावे ? डायग्राम काढण्याची पद्धत,बुद्धीमत्ता चाचणीचे प्रश्न,पर्यायी उत्तरे कसे शोधावे या संबंधीच्या माहितीचे उदाहरणसह स्पष्टीकरण दिले. यावेळी 100 पेक्षा अधिक विद्यार्थी उपस्थित होते.

प्रस्तुत मार्गदर्शन कोर्स करिता डॉ.महेंद्र महाजन,डॉ.प्रियंका पाटील,डॉ.वंदना पाटील,डॉ.रवी बाळसकर,डॉ.माधव भुसनर,डॉ.बालाजी कांबळे, डॉ.राखी घरटे,प्रा.दिलीप तडवी,डॉ.हर्ष नेतकर,गणित विषयाच्या प्रा.प्रिंयका पाटील,प्रा.निकिता पाटील,प्रा.इरफान कुरेशी आदी उपस्थित होते.
सदर कोर्सच्या तांत्रिक व अन्य बाबीसाठी प्रा.हिमांशू गोसावी,प्रा.अमोल अहिरे,दिलीप शिरसाठ,पराग पाटील,विशाल अहिरे,अतुल धनगर आदींनी विशेष सहकार्य केले.
प्राचार्य डॉ.ए.बी.जैन यांनी मार्गदर्शन वर्ग सुरू असताना पूज्य साने गुरुजी सभागृहास भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधले.यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
प्रस्तुत तिस-या दिवसाच्या कोर्सचे सूत्र संचालन कोर्सचे समन्वयक डॉ.जितेंद्र पाटील यांनी केले तर आभार करिअर कौंसेलिंग सेंटरचे प्रमुख डॉ.विजय तुंटे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!