विशेष लेख….
कोणासाठी किती काहीही करा,काही ऊपयोग नाही.
आयुष्य बिनधास्त जगायचे, कुणाचे वाईट करायचे नाही… कुणाचे वाईट चिंतायचे नाही… कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही.
*फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं.*
काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही.
कुणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही,
लोकांची विविध रूपे असतात… सकाळी गोड बोलतात आणि *रात्री कुणी काही डोक्यात भरवले की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात.*ज्याच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो.
*आजकाल लोकं देवावर पण नाराज होतात तर तुम्ही कोण?*
कुणी कितीही वाईट बोलो किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करो….
*कुणाच्या आयुष्यात डोकवायचे नाही आणि कुणाविषयी मागे वाईट चर्चा करायची नाही.*
*फक्त स्वतः बरोबर दुसऱ्याचे हीत चिंतायचे.कुणाच्या पुढेपुढे करायचे नाही.*
“जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची.”
*थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात,*
*तसेच शांत डोके आणि ऊबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात.*
*नेहमी हसत रहा,*
*हा सुंदर जन्म पुन्हा नाही.*
*❝ आपुलकीच्या माणसांसाठी ❞*
